- दोन वर्षांत तब्बल सात अधिकाऱ्यांच्या नेमणुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी उपायुक्त मनोज लोणकर यांच्याकडून काढून हा विभाग क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
क्रीडा विभागासह माहिती व जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. दरम्यान, दोन वर्षांत जनसंपर्क विभागाचे तब्बल सात अधिकारी बदलेले आहेत.
सहायक आयुक्त अण्णा बोदडे, नीलेश देशमुख, वेंकटेश दुर्वास, वामन नेमाणे, उपायुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, मिनीनाथ दंडवते हे अधिकारी विभागप्रमुख होते. सातत्याने विभागप्रमुख बदलला जात असल्याने विभागाची घडी विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.












