न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- पवित्र मंत्रोच्चारांचा ध्वनी, शंखनाद आणि जय श्रीरामांच्या घोषात प्रभुशीरामांचा आयोध्या नगरीत आगमन झालं, आणि अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आला. हा सोहळा अवघ्या देशाने डोळे भरून पाहिला आणि सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणवल्या तसेच ऊर अभिमानाने भरून आला.
सर्व मोठ्यांपासून ते लहनांपर्यंत मनामनातून जय श्री रामाचा जयघोष निनादला, या सोहळ्याचे औचित्य साधून प्राधिकरणातील श्री. जिव्हेशवर हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष वर्षा शेटे, सचिव दिनेश ठोके, खजिनदार प्रमोद शिंपी आणि इतर सभासदांबरोबर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी उपमहापौर व नगरसेविका सौ शैलाजाताई मोरे यांच्या हस्ते दिप-प्रज्वलाने झाली. अनुप मोरे यांची उपस्थिती या सोहळ्यास लाभली. मान्यवरांसोबत सोसायटीतील सर्व सभासद आणि लहान मुलांनी रामरक्षा पठणाचा, सर्व लहान मुलांनी रामायणातील एक-एक प्रसंग यावर कथाकथन, चित्रकला असे कार्यक्रम घेतले. यानंतर कारसेवक तेजश्री अष्टेकर आणि नंदकिशोर अंजीखाणे यांनी राममंदिराबाबत 1990 च्या प्रसंगातील आठवणी सर्वांना सांगितल्या. यानंतर रामाची आरती होताच पेढ्यांचे वाटप करण्यात आलं, कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं होतं. यावेळी सोसायटीतील सर्व सभासदांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.











