न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पथक व युनिट यांना आदेश दिले होते. त्यानुसार दरोडा विरोधी पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत होते. रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेऊन पोलिसांनी (दि. २४) रोजी कारवाई केली. दरोडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली.
रेकॉर्डवरील आरोपी विरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय ३० वर्षे, रा. आळंदी) याला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन ०१ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्याविरुध्द आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयातील निष्पन्न आरोपी १. राहुल बसवराज सर्जन (वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), २. अमोल फिलीप साळवे (वय ३० वर्षे रा. भोसरी) यांना सुध्दा दाखल गुन्हयात (दि. २५) रोजी सकाळी ११/०० वाजता अटक करण्यात आली आहे. गुन्हयातील अटक आरोपी अमोल फिलीप साळवे याच्याकडुन आणखीन ०२ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, विवके मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, गणेश हिंगे, विनोद वीर, महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.











