- वाल्हेकरवाडीतील प्रकार; सात दिवसांची पोलीस कोठडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- पेटींग कामासाठी दिलेली अडव्हान्स ५०,००० रुपये रक्कम परत देण्याची मागणी केली. त्यासाठी कारमधुन आलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या ३८ वर्षीय मयत पतीचे अपहरण केले. सुटकेसाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अज्ञात हत्याराने त्यांना मारहाण करुन जीवे ठार मारले आहे. त्यांची मयत बॉडी हॉस्पिटलमध्ये सोडुन दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २६) रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० च्या दरम्यान मुकाई चौक, रावेत येथे घडली. महिला फिर्यादीने १) शुभम दिलीप वाल्हेकर (वय २७ वर्षे, रा. वाल्हेकरवाडी), २) सागर जगन जाधव (वय २७ वर्षे रा. रहाटणी फाटा), ३) कुनाल सुरेश भरम (वय २३ वर्षे रा. वाल्हेकरवाडी), ४) सौरभ राजेद्रं वाघमारे (वय २५ वर्षे रा. वाल्हेकरवाडी), ५) अक्षय लक्ष्मण पाटील (वय २३ वर्षे रा बिजलीनगर), ६) दिनेश रामेश्वर म्हस्के (वय २७ वर्षे रा वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ८४ /२०२४, भादंवि कलम ३६४, ३०२, २०१, १४३, १४५, १४८, १४९ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींना मे. कोर्टात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची पुढील ०७ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
आरोपी गुन्ह्याची देताना म्हणाला ” आमचे मालक शुभम दिलीप वाल्हेकर याने इनोव्हा कारमधुन एका इसमास वाल्हेकरवाडी येथील साईडचे पत्राशेडमध्ये आणले होते. इसम हा शुभम वाल्हेकरकडुन पेटींगच्या कामाकरीता घेतलेले पैसे परत देत नव्हता व त्यांचे काम देखील करीत नव्हता. या कारणावरुन शुभम वाल्हेकरसोबत असलेले कुणाल भरम व सौरभ वाघमारे यांनी सदरच्या इसमाचे हात पाय काथ्याने व रिबीनने बांधले. त्यानंतर कुणाल वाल्हेकर याने बांधलेला इसम भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या याला ‘तु माझे पैसे दे नाहीतर तुला मारणार’ असे म्हणाला. सदरचा इसम माझेकडे पैसे नाही असे म्हणाला. त्यामुळे शुभम याने चिडुन जावुन सागर जाधव, आकाश धापटे, कुणाल भरम, सौरभ वाघमारे, दिनेश मस्के यांच्यासोबत हातातील पिव्हीसी पाईपने मयत इसमाला मारहाण करन्यास सुरुवात केली. या मारहाणीत भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या हा बेशुध्द् पडल्याने दिनेश मस्के व अक्षय पाटील असे दोघेजण मनोज मौर्या यास रिक्षामध्ये घालुन न्यु थेरगाव हॉस्पीटल थेरगाव पुणे येथे आणुन सोडुन पळुन गेले.











