- तर, तीन एपीआय आणि एका पीएसआयची शहरात बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील अकरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची गुन्हे शाखा, विशेष शाखा, तसेच वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर राज्यातील विविध घटकांमध्ये कार्यरत असलेल्या ३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आठ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे.
मागील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने या बदल्यांचा धडाका सुरू आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदली झालेले वरिष्ठ निरीक्षक :- गणेश जवादवाड (वाकड ठाणे ते गुन्हे शाखा), कृष्णदेव खराडे (शिरगाव ठाणे ते विशेष शाखा), अमरनाथ वाघमोडे (रावेत ठाणे ते गुन्हे शाखा), शंकर अवताडे (तळेगाव दाभाडे ठाणे ते गुन्हे शाखा), संजय तुंगार (तळेगाव एमआयडीसी ठाणे ते सायबर सेल), अशोक कदम (चाकण ते गुन्हे शाखा), राम राजमाने (पिंपरी ठाणे ते विशेष शाखा), वसंत बाबर (म्हाळुंगे एमआयडीसी ठाणे ते गुन्हे शाखा, श्रीराम पौळ (हिंजवडी ठाणे ते गुन्हे शाखा), राजेंद्र निकाळजे (एमआयडीसी भोसरी ठाणे ते गुन्हे शाखा), बडेसाब नाईकवडे (पिंपरी ठाणे ते वाहतूक शाखा).
मुंबई शहर येथे नेमणुकीस असलेल्या श्वेता रणजित घोरपडे, रायगड येथून प्रवीण शिवहार स्वामी आणि चंद्रपूर येथून रमेश शहाजी हत्तीगोटे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे. मुंबई शहर येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक मयुरेश विजय साळुंखे यांची देखील पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.















