न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- पिंपरीगाव येथील बोट क्लबजवळ शनिवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास मित्रांसोबत पोहायला गेलेला आठ वर्षीय मुलगा पवना नदीपात्रात बुडाला.
विशाल भीम थापा असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्य सुरु आहे.











