न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची वर्णी लावली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले होते.
परंतु नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा भ्रमनिरास केला असून शहराच्या तोंडाला केवळ पाने पुसली आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त जागेवर पिंपरी-चिंचवड भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना उमेदवारी न देता विदर्भाचे अरुण अडसर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
मंत्रालयाचा कारभार पुण्याऐवजी नागपुरहून चालू असल्याचे सिद्ध होत असून, पिंपरी-चिंचवड शहराला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. महापालिका निवडणुकीत ”नको बारामती, आपलं पिंपरीच बर! या घोषणेऐवजी आता बारामतीऐवजी नागपूर म्हणण्याची वेळ जवळ येती का काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे
आझम पानसरे यांना डावल्यामुळे समर्थक नाराज असून आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.