न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- संजय कुंभार प्रस्तुत ‘तोच चंद्रमा नभात’ मराठमोळी कवियत्री शांताबाई शेळके यांच्या गीतांची महफील ४ फेब्रुवारी रविवारी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे आयोजक अमित गावडे आहेत.
या महफीलमध्ये ललिता जगदाळे, शृंगेरी भावसार, प्रतिक्षा कुंभार, अरुणा मुळे, राजीवजी पंडित, भारते, कौस्तुभ कुंभार, संदीप बोरकर, विवेक जडे यांच्या सुमुधर आवाज रसिकांना ऐकायला मिळणार आहे. महफीलीचे निवेदन विना कुंभार – दुधगावकर या करणार आहे.यात सहभाग शीतल कुलकर्णी, हेमलता खेडकर, सविता पाटील यांचा असणार आहे.











