न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- फुगेवाडी येथील बीआरटी मार्गातून येणाऱ्या बसेस यांचा वेग कंट्रोल करण्यासाठी मोठ मोठे स्पीड ब्रेकर बसवावे तसेच पांढऱ्या पट्ट्या आखण्यात याव्या, अशी मागणी आम् आदमी पार्टीचे माहिती अधिकार आघाडी अध्यक्ष यलाप्पा वालदोर यांनी बीआरटी विभागाकडे केली आहे.
फुगेवाडी येथील बीआरटी खुप धोकादायक ठरत आहे. फुगेवाडी शाळेजवळ असलेला हा अंडर पास बोगदा यामधून शाळेतील विद्यार्थी /पालक ये जा करत असतात, तसेच अनेक वाहने सुद्धा या अंडरपास मधून ये जा करत असतात. अशावेळी दोन्ही बाजूने बीआरटी मार्गातून आलेली बस ही लोकांना दिसत नाही अचानक बस आली की जीवघेणा अपघात होऊ शकतो.
पुण्याहून येणाऱ्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या अनेक पीएमपीएमएलच्या बसेस ह्या भरधाव वेगाने येत असतात. त्यांचा वेग कंट्रोल करण्यासाठी तिथे स्पीड ब्रेकर आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात तिथे मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्याची खबरदारी म्हणून महापालिका बीआरटी विभागाने लवकरात लवकर दोन्ही बाजूच्या दिशेने स्पीड ब्रेकर बसवावे. अंडर पास बोगद्याचा सुरळीत वापर करावा, असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.