- कर्ज उचलून केली वाहनखरेदी; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- आपसात तिघांनी संगनमत करून त्यांच्या नावाचे आधारकार्ड, शॉप अॅक्ट लायसन्स व लीव्ह अँड लायसन्सचे अॅग्रीमेंट अशी बनावट कागदपत्रे बनवली. ती कागदपत्रे वाहने खरेदी करण्यासाठी फिर्यादीला सादर केली. फिर्यादीच्या टीव्हीएस क्रेडिट सर्विस लिमिटेड, तसेच मनबा फायनान्स लिमिटेड, बजाज फायनान्स व आयडीएफसी फर्स्ट बँक या फायनान्स कंपन्यांकडून लोन घेतले.
त्याव्दारे वाहने खरेदी करून, त्यापैकी काही वाहने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता परस्पर कोणालातरी विक्री करून फिर्यादी यांच्या कंपनीची, तसेच इतर फायनान्स कंपन्यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि ०१) रोजी दुपारी ४.१० च्या सुमारास काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव येथे घडला.
फिर्यादी चंदनसिंग शिवराम महाजन यांनी आरोपी १) नितेश प्रमोद रॉय, २) फत्ते अन्सारी, ३) गिरीष संजय पाटील, ४) आकाश राजेंद्र जयस्वाल, ५) सचिन आप्पा भोसले, ६) फिरोज जमशेद खान यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांनी ७६ /२०२४, भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. पोउपनि रायकर पुढील तपास करीत आहेत.