न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- आई रागावल्याने तेरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जतीन सोमनाथ कुदळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
जतीन इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. जतीन अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली होती. याच रागातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
जतीन ला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३१ जानेवारी) रोजी घडली. गुरुवारी (दि. १) रोजी जतीनचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.