न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- बहुचर्चित वाकड टीडीआर घोटाळ्याला प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. घोटाळ्यातील नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.
निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता “बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या आऊट गेटवर संविधानिक मार्गाने अनेक उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सतिश काळे यांनी दिली.