न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :-प्राधिकरणातील भेळ चौक आणि चऱ्होलीतील रस्त्यांवर रविवारी दुपारी ऑइल सांडले होते. त्यामुळे अनेक गाड्या घसरून पडल्या. अग्निशामक दलाच्या पथकाने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील ऑइल स्वच्छ केले.
चऱ्होलीत डंपरमधून दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऑइल सांडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांचे पथक आले. जिथे ऑइल सांडले आहे. त्या ठिकाणी माती टाकली. पाण्याद्वारे रस्ता स्वच्छ केला. त्यामुळे धोका टाळला. तोपर्यंत काही दुचाकी घसरून पडल्या होत्या.
भेळ चौकातही एका वाहनामधून रस्त्यावर ऑइल सांडल्याचे आढळून आल्यानंतर अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याच्या फवाऱ्याद्वारे ज्या ठिकाणी ऑइल सांडले आहे. तेथील रस्ता स्वच्छ केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख ऋषीकांत चिपाडे यांनी दिली.













