न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. ५) रोजी रुपीनगर,तळवडे येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक थेरपीद्वारे उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब सुखदेव नरळे यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरवात पूजनाने झाली. शिबीरामध्ये नेत्र चिकित्साही करण्यात आली. नागरिकांना अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले. तसेच काहींची डोळ्यांची शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
या शिबिरास महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड युवा सेना शहर प्रमुख चेतन पवार, उपजील्हा प्रमुख निलेश मुटके, शहर संघटक संतोष सौंदणकर, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, पिंपरी चिंचवड प्रभारी अशोक वाळके, विधानसभा महिला संघटिका कल्पना शेटे, संघटक रावसाहेब थोरात, शहर संघटक प्रवीण राजपूत, समन्वयक राजेंद्र राठोड, समन्वयक सुजाता काटे, युवा सेना चिटणीस सुनील सामगीर, युवा अधिकारी अमित शिंदे, विभाग प्रमुख नितीन बोंडे, उपविभाग प्रमुख पांडुरंग कदम, अशोक जाधव, नागेश अजुरे, गणेश भिंगारे, प्रवीण पाटील, शाखाप्रमुख अभिमन्यू सोनसळे, सतीश कंठाळे, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण, मोहन जाधव, सुजित साळवी, सुनिल भाटे, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे, उपशाखाप्रमुख भरत पाटील, बाळासाहेब वरे, कैलास तोडकर, जालिंदर घायाळ, ज्ञानेश्वर उत्तेकर, समीर हरपळे, सुभाष कोल्हे, सखाराम हलगुरे, सुनिल बधे, आनंद हिंगे, हरिभाऊ लोहकरे, अनंत सोबती, सुखदेव देवकर, तुकाराम जाधव, रमेश भालेकर, बाबासाहेब काळोखे.व तसेच आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश क्षीरसागर, सुखदेव नरळे, भो.वि.संघटक लिंबाजी जाधव, दीपक पाटील, भो.वि.सचिव काटोळे. तसेच वंचित आघाडीचे वार्ड अध्यक्ष बळीराम भोले, उपाध्यक्ष चंदन गायकवाड, महासचिव कुमार गावंडे, खजिनदार विक्रम साळवे व ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सदाशिव पडळकर, नामदेव नरळे यांनी केले.











