न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- देहुगावात संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ८) ते बुधवार (दि.. १४) कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. वैकुंठ गमनस्थान परिसरात मंडप उभारणीचे काम सुरु झाले आहे.
संत तुकाराम महाराज जन्मोत्सव १४ फेब्रुवारी म्हणजे वसंत पंचमीला असल्याने कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. वैकुंठ स्थान येथे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे.
गुरुवारी (दि. ८) विकासानंद मिसाळ यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी (दि. ९) महादेव महाराज राऊत, शनिवारी (दि. १०) प्रमोद महाराज जगताप, रविवारी (दि . ११) पंकज महाराज गावडे, सोमवारी (दि. १२) नीलेश महाराज झरेगावकर, मंगळवारी (दि. १३) संजय महाराज घोडगे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (दि. १४) देहूकर महाराज यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होईल.