न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘गाव चलो अभियान’ ची आढावा बैठक घेण्यात आली. ‘‘घर घर पहुंचाएंगे मोदी का संदेश, आगे बढेगा गाव, आगे बढेगा देश..’’ अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी शिरूर लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, संयोजक दक्षिण भारतीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश राजेश पिल्ले, जिल्हा सरचिटणीस शैला मोळक, मंडळ अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, संतोष तापकीर, माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती माजी अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे व संतोष लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष आशा काळे, चिटणीस राजश्री जयभाय, गीता महेंद्र, महिला आघाडी प्रदेश चिटणीस कविताताई हिंगे व वीणा सोनवलकर तसेच उद्योजक सुरेशतात्या म्हेत्रे भोसरी विधानसभेतील सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका, भाजपा शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी, सर्व वॉरियर्स, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.४ ते ११ फेब्रुवारी या काळात हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये ७ लाख खेड्यांमधील बूथवर भाजपा पक्ष कार्यकर्ते आठवडाभर जनजागृती करणार आहेत. या माध्यमातून मोदी सरकर आणि भाजपा प्रणित राज्य सरकारच्या विविध लोकपयोगी योजना, विकासकामे आणि कामगिरी याबाबत लोकांना माहिती देण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान निर्णायक ठरणार आहे. त्यादृष्टीने आम्ही नियोजनबद्ध काम करीत आहोत.
प्रास्ताविक पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे यांनी केले. अभियानाची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे संयोजक विलास मडिगेरी व भोसरी विधानसभा सहसंयोजक पोपट हजारे यांनी दिली.











