- मुलाच्या आईकडे पैशाची मागणी; आईची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- ऊस तोडणीसाठी पतीने घेतलेली उचल परत घेण्यासाठी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी महिलेच्या वीस वर्षीय मुलाचे अपहरण केले आहे. त्याला अज्ञात ठिकाण डांबुन ठेवुन त्याला सोडविण्यासाठी मुलाच्या आईकडे पैशाची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी आरोपी देत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.५) रोजी सकाळी ८.०० ते (दि. ६) रोजी सकाळी १०.०८ च्या दरम्यान पिंपळे सौदागर, पुणे परिसरात घडला आहे. महिला फिर्यादीने आरोपी संदिपान फड उर्फ फड आबा व त्याचे साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ३५/२०२४, भा.दं. वि. कलम ३६५, ३४१, ५०६, ३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप-निरीक्षक एम एस भालेराव पुढील तपास करीत आहेत.











