न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- चालकाने त्याचा छोटा टेम्पो राहत्या पत्र्याच्या घरासमोर पार्क केला होता. टेम्पोची चावी स्टेअरींगला विसरून तो जेवण करण्यासाठी घरी गेला. त्यानंतर कुटुंबासह पत्र्याच्या घरात झोपला. दरम्यान आरोपी विधिसंघर्षित बालक याने वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना हलगर्जीपणे टेम्पोमध्ये बसुन स्टेअरींगला लावलेली चावी फिरवली.
त्यामुळे टेम्पो चालु झाला आणि तो पत्र्याच्या घरात घुसला. दुर्घटनेत चालकाच्या मुलीच्या अंगावर पत्रा पडल्याने ती पत्र्याच्या खाली दबली. तीच्या डोक्याला गंभीर दुखापत होउन ती मयत झाली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मयत असा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास केला असता घटनेचा उलगडा झाला.
ही दुर्घटना (दि.१३/०८/२०२३) गणेशनगर, शिंदे वस्ती, बी.आ.टी. रोडवरील ओव्हर ब्रीचखाली सर्व्हिस रोडच्या बाजुला रेल्वे टपरीजवळ, रावेत येथे घडली होती. पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात ४७/२०२४ भा.द.वि.कलम २७९,३०४ (अ) सह मो.वा.का. कलम ४(१)/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सहा.पो.उप निरीक्षक राकेश पांलाडे पुढील तपास करीत आहेत.











