न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- मोशी येथील कचरा डेपा समोरील मोकळया मैदानात अज्ञात कारणावरुन २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. मारेकरी पसार झाले होते. दरम्यान पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तिघा आरोपींना खेड तालुक्यातील नारायणगाव बस स्टैंडसमोरून ताब्यात घेतले आहे.
१. शुभम अशोक बावीस्कर (वय २३ वर्षे रा. धावडे वस्ती भोसरी), २. विजय उमेश फडतरे (वय २२ वर्षे रा. गायकवाड वस्ती मोशी),रिक्षा चालक प्रशांत सुधाकर कांबळे (वय १९ वर्षे रा. गुळवे वस्ती, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अमोल पवार असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना (दि. ५) रोजी दुपारी ०१:०० ते ०१:३० च्या दरम्यान उघडकीस आली होती. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, डॉ. विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश सावंत, सुमित देवकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.