न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन द्वारे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व रहिवाशी सोसायटी / कॉलनी यांच्यासाठी भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथे महिला आणि पुरुष अश्या दोन्ही गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली.
दि. ४ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा शुभारंभ चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते झाला. दि. ९ फेब्रुवारी रोजी स्पर्धेची बक्षीस वितरणाने सांगता झाली . बक्षीस वितरण समारंभ पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष श्री.शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. उन्नती चषक महिला विभागात , प्रथम विजेते – शिवम सोसायटी द्वितीय – कुणाल आयकॉन सोसायटी , तृतीय – रोज आयकॉन सोसायटी , चतुर्थ – ज्ञानगंगा सोसायटी . उन्नती चषक पुरुष विभागात प्रथम विजेते – जरवरी सोसायटी द्वितीय – पूर्वा रेसिडेन्सी , तृतीय – साई पर्ल सोसायटी चतुर्थ – वेरोनिका सोसायटी तर , उन्नती चषक गाव हाफ चे विजेते- अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन , उपविजेते – विराज जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन या संघांनी विजेतेपद प्राप्त केले . ६ दिवस चाललेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. विशेषतः रोजच्या धकाधकीच्या जीवनात या स्पर्धेमुळे विरुंगुळा प्राप्त झाला अशी भावना सहभागी संघांतील महिला खेळाडूंनी याप्रसंगी व्यक्त केली.
खेळाडूंना शुभेच्छा प्रदान करताना, शंकर जगताप म्हणाले , “दररोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाचे – सुदृढ शरीरसंपदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे .उन्नती सोशल फाऊंडेशन आयोजित केलेली भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा ही पिंपळे सौदागर मधील रहिवाश्यांच्या दृष्टीने निश्चितपणे आरोग्यवर्धक ठरणार आहे . सहभागी संघातील खेळाडूंनी सुद्धा केवळ स्पर्धेपुरते खेळ आणि व्यायाम यांच्या आपल्या जीवनशैली मध्ये अंगीकार न करता त्याचे सातत्य राखावे . अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी उन्नती सोशल फाऊंडेशन आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो . विजेत्या आणि उपविजेत्या अश्या दोन्ही संघांचे देखील मनापासून अभिनंदन करतो.”
या स्पर्धेसाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, सुप्रसिद्ध गायक अवधुत गांधी, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ कुंदाताई भिसे, संस्थापक संजय भिसे, जयनाथ काटे, जगन्नाथ आप्पा काटे, विजय भिसे, आण्णा शेलार, राजू शेलार, भानुदास काटे पाटील, उद्योजक संदीप काटे, मनोज ब्राह्मणकर, फाऊंडेशनचे कोअर कमिटी मेंबर सागर बिरारी, अतुल पाटील, विजय भांगरे त्याचप्रमाणे, पिंपळे सौदागर मधील सर्व सोसायटी चेअरमन, विठाई वाचनालयाचे सर्व सभासद, आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद , लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद ऑल सीनिअर सिटिझन असोसियेशन चे सर्व सभासद आणि बहुसंख्येने पिंपळे सौदागर मधील नागरिक आणि क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











