- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटेंकडून स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- नागपूर येथे थाईबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. पिंपळे सौदागर येथील यु.एफ.एफ.सी क्लबच्या विद्यार्थी यांनी वयोगट १२ वर्षे, १४ वर्षे आणि १८ वर्षे प्रकारात स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
कु. अवनिश गंगमवर, कु. ईशान बोंगाळे, कु. आयुष मिश्रा आणि कु. लक्ष्य मांजरेकर यांनी थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” मिळविले. याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सुवर्ण भरारी घेणाऱ्या या सर्व स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंगचे अध्यक्ष नरेश म्हेत्रे, प्रशिक्षक पल्लवी पाटील व पालक उपस्थित होते.
आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याची किमया या नव्या पिढीने करून दाखविली. पुढील काळात अशीच घवघवीत यश संपादन करून पिंपळे सौदागरचे नाव देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवा, अश्या शुभेच्छा शत्रुघ्न काटे त्यांनी दिल्या.










