- आईवर चाकूने सपासप वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- ‘कपाटात सोन्याचे दागिने नाहीत. ते कुठे आहेत. तु गहाण ठेवले अगर विक्री केली काय’, अशी विचारणा आईने मुलाकडे केली. आईने ‘मी पोलीसांना बोलवते’ असे म्हणताच मुलाने ‘तु जिवंत राहिली तरच पोलीसांना बोलवशील’ असे म्हणत त्याच्या हातातील चाकूने फिर्यादी आईच्या डोक्यावर, दोन्ही हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार (दि. ११) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी १६ नंबर, थेरगांव येथे घडला. फिर्यादी आईने आरोपी मुलगा ओकार ऊर्फ ओमकार ईश्वर बामणे (वय १९ वर्षे, धंदा शिक्षण) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपी मुलाच्या विरोधात १५५/२०२४ भा द वि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे पुढील तपास करीत आहेत.