न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२४) :- ‘टु व्हीलरला कट मारला’ या कारणावरुन तिघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी, दगडाने मारहान केली. फिर्यादीला तोंडावर आणि कानाचे हाड फॅक्चर करून डोक्यावर दोन ठिकाणी जखम केली. एका ठिकाणी ४ टाके व दुस-या ठिकाणी १ टाके पडले आहे. तसेच फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, डाव्या पायाचे मांडीवर, डावे हाताचे खांद्याजवळ मुक्का मार लागुन गंभीर जखमी केले आहे.
तसेच फिर्यादी यांच्या मदतीसाठी आलेल्या मित्राला देखील आरोपींनी हाताने मारहान केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १२) रात्री ८.३० च्या सुमारास सदगुरुनगर कमानीजवळ, नाशिक पुणे हायवे, भोसरी येथे घडली आहे.
फिर्यादी श्रीधर लक्ष्मण पवार यांनी आरोपी १) विजय चव्हाण, २) पंकज वर्मा व ३) बाब्या (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली असून तिघांच्याही विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात ८७/२०२४, भा.दं.विकलम ३२६,३२४, ३२३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि शेख पुढील तपास करीत आहेत.











