न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२४) :- मेडीकल दुकानादाराला रस्त्यात अडवून सशस्त्र दरोडा घालुन रोख रक्कम लुटणाऱ्या चोरटयांना वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. वाकड येथील कलाटे गार्डनमधील चंदन फार्मासिस्ट मेडीकल दुकान (दि. ७) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास दुकान बंद करुन मेडीकलमधील दिवसभराची रोख रक्कम ४५,५६० रुपये घेवुन दुचाकीवर फिर्यादी जात असताना ही घटना घडली. त्यावेळी पाच अनोळखी इसम तिथे आले होते. त्यांच्यातील एका इसमाकडे लोखंडी कोयता होता, आरोपी यांनी फिर्यादीच्या हातातील रोख रक्कम असलेल्या बॅगवर जबरदस्तीने दरोडा टाकत मोपेडवरुन पळुन गेले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. गुन्हा करुन पळुन जाताना आरोपींनी तोंडाला मास्क लावल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड होते. आरोपी हे त्याच परीसरात खुप वेळ फिरत होते. यावरुन आरोपींना फिर्यादी हे पैसे घेवुन येणार याची आधीच माहीती होती, याचा धागा पकडुन तपास सुरु केला. आरोपींनी गुन्हा करणेकरीता येताना व गुन्हा करुन पळुन जाताना ज्या रुटचा वापर केला होता. त्यांचा शोध घेवुन सर्व आरोपीची ओळख पटवीली. आरोपी हे भोसरी भागात नेहमी एकत्र येत असलेची माहीती मिळाली तसेच त्यांचेतील ०३ आरोपी हे सराईत गुन्हेगार असलेची माहीती मिळाली. आरोपी हे राजीचे वेळी भोसरी भागात निर्जन स्थळी बसलेले आहेत अशी माहीती मिळालेने लागलीच तेथे जावुन छापा कारवाई करीत ०४ आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला.
१) व्यंकटेश ऊर्फ हर्षल परशुराम जाधव (वय २० वर्षे रा. तायरा कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण), २) आदेश परशुराम शिंदे (वय २२ वर्षे, रा. काटे कॉलनी, च-होली फाटा), ३) गोविंद लालु रुपवते (वय १९ वर्षे, रा. सद्गुरु नगर, भोसरी), ४) एक विधीसंघर्षीत बालक या आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली. ‘आम्ही व आमचा गुन्हयातील साथीदार सोन्या ऊर्फ ऋषीकेश नाना धोजे (वय २१ वर्षे रा. दुर्गामाता नगर, चिंचवड स्टेशन, चिंचवड) असे आम्ही ०५ जणांनी मिळून सदरचा गुन्हा केला आहे. आमचेतील प्रतिक दाँडकर हा आशिष शहा यांचे मेडीकल मध्ये पूर्वी कामास होता त्यास माहीती होती की, मालक केव्हा रोख रक्कम घेवुन जात असतात त्यांचा फायदा घेवुन आम्ही गुन्हा केला आहे, असे तपासात आरोपींनी सांगीतले.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, बापु बांगर पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांचं मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुद् सावर्डे, श्रेणी पोउपनि बिभीषण कन्हेरकर, श्रेणीपोउपनि. बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. रामचंद्र तळपे, पोशि, भास्कर भारती, पोशि. अजय फल्ले, पोशि, स्वप्निल लोखंडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.











