न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- व्यवसायाकरिता आरोपी यांनी कर्ज काढले होते. कर्ज प्रकरणामध्ये आरोपी यांनी त्यांच्या मालकीची ५०० स्क्वेअर फुट जागा व त्यावरील बांधकाम अशी मिळकत बँकेकडे तारण ठेवलेली होती. आरोपी यांनी बँकेचे कर्ज थकविल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करीत मिळकतीवरील घर जप्त करुन मिळकत सील केली होती.
घर बँकेने सील केलेले असल्याचे आरोपी यांना माहीत असताना देखील आरोपी यांनी बँकेची अगर कोणत्याही न्यायालयाची पुर्वपरवानगी न घेता मिळकतीच्या मुख्य दरवाजाला लावलेले सीलबंद कुलूप तोडुन अनधिकृतपणे घर/मिळकतीमध्ये प्रवेश केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १३) नेवाळेवस्ती, चिखली येथील आरोपीच्या राहते घर/मिळकतीमध्ये घडली.
फिर्यादी मनिष सुरेश वारके यांनी आरोपी १) घनश्याम प्रभाकर कानडे, २) संदीप प्रभाकर कानडे, ३) दत्तात्रेय प्रभाकर कानडे, ४) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ८७/२०२४ भा.दं.वि कलम ४४८,३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोना महाले पुढील तपास करीत आहेत.











