न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- खेड तालुक्यातील निघोजे येथील महींद्रा कंपनीत नोकरी लावतो, असे आमिष आरोपीने फिर्यादीसह त्यांचे नातलग तसेच मित्रांना दाखवीले. फिर्यादीकडुन त्यासाठी आरोपीने वेळोवेळी १०,४१,५०० रुपये रक्कम घेतली.
आरोपीने महींद्रा कंपनीचे बनावट ऑफर लेटर पाठवुन कोणतीही नोकरी लावुन दिली नाही. तसेच आरोपीने फिर्यादीकडुन घेतलेली रक्कम व ब्लॅक चेक परत केलेला नाही. याबाबत आरोपीस विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करुन धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना दि.०६/११/२०२३ ते ०५/०२/२०२४ दरम्यान घडली आहे. महिला फिर्यादीने आरोपी १) अभिषेक अशोक खालकर, २) महीला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ९०/२०२४ भा.दं.वि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५०४,५०६,३४ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि घाडगे तपास करीत आहेत.











