न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- एक तरुण हा केएसबी चौक ते निगडी या रस्त्याने एका चारचाकी गाडीच्या टपावर बसुन स्टंटबाजी करीत असुन त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या निगडी वाहतूक विभागाने व्हिडिओचे लोकेशन काढुन गाडी नंबर वरुन त्याचा नाव व पत्ता काढला. तरुणाच्या पत्त्यावर जावून त्याची चौकशी केली.
१) ओंकार कृष्णा मुंडे (वय २४ वर्ष रा. कृष्णानगर, पोलीस लाईन निगडी), २) प्रतिक सुशिल शिंगटे (वय २४ वर्ष, कृष्णानगर निगडी) यांच्याविरुध्द कडक कारवाई केली. गाडीमधुन सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, हयगयीने निष्काळजीपणे प्रतिक याने वाहन चालवून व मुलगा हा गाडीच्या टपावर बसुन स्टंटबाजी करुन स्वतःच्या जिवीतास व रस्त्यावरील इतर प्रवाशी वाहनचालक यांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. त्यांच्याविरुध्द भोसरी एमआयडीसी पो.स्टे.गु.र.न. ८४/२०२४ भादवि.क. २७९,३३६, मोवाका.क.१८४, १७९/१७७, प्रमाणे दि १५/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
अशाप्रकारे सार्वजिनक रस्त्यावर चारचाकी / दुचाकी वाहनांवर स्टंटबाजी करुन स्वतःचे व इत रस्त्यावरील नागरिकांचे जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणा-या तरुणांवर वरील प्रमाणे कारवाई करण्याचे सातत्य राखले जाईल. ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा पिंपर चिंचवड यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली केलेली आहे.