न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- सराईत रेकॉर्डवरील, मोक्का गुन्हयामध्ये पाहीजे असलेला गुन्हेगार जतिन उर्फ सोनू बिपीन टाक रा. पिंपरी हा त्याचे कमरेला पिस्टल लावुन पिंपरी परिसरात संशयितरित्या फिरत आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २ च्या (दि. १५) पोलिसांना मिळाली.
पिंपरीतील रिव्हररोड, सुभाषनगर झुलेलाल मंदीराजवळ आरोपी थांबला असल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांनी त्या परिसरात सापळा लावला. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जतिन उर्फ सोनू टाक हा घराच्या बाजुला थांबला असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी त्यास पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळुन जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीला पकडले. अंगझडतीमध्ये कमरेला लावलेले एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जतिन उर्फ सोनू बिपीन टाक (वय २९ रा. सुभाषनगर रिव्हररोड झुलेलाल मंदीरजवळ पिंपरी) याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, आर्म अॅक्ट, दुहेरी मोक्का असे गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल आहेत. श्री गणपती विसर्जन २०२३ रोजी जतिन उर्फ सोनू बिपीन टाक याने पिंपरी येथे फिर्यादी रोहीत भगवान वाघमारे रा. मिलींदनगर पिंपरी याचेशी भांडण मारामारी करुन पिस्टल लावुन जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला होता व तेव्हापासुन तो पळुन गेला होता. त्याचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल असुन एका गुन्हयामध्ये तो पाहीजे आरोपी आहे. आरोपीत याने बेकायदेशीर विना परवाना जवळ बाळगलेल्या पिस्टलबाबत सखोल विचारपुस करुन आरोपीत याचे विरुध्द गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस कॉस्टेबल बक्कल नंबर १९२० अजित आण्णा सानप यांची सरकार तर्फे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे फिर्याद घेवून पिंपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक केराप्पा माने, सपोफी दिपक खरात, दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, विपुल जाधव, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.











