- निगडीतील प्रभाग १३ मध्ये ‘गाव चलो अभियानास’ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. 16 फेब्रुवारी 2024) :- पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गांव चलो अभियान कार्यक्रम चालू आहे, त्याच माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर भाजपा वाहतूक आघाडीच्या वतीने वाहतूक आघाडीचे शहर अध्यक्ष
दीपक मोढवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये ‘गाव चलो अभियान’ शुक्रवारी (दि. १६) रोजी राबवण्यात आले.
यावेळी मोढवे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. मोदी सरकारच्या योजना या लोककल्याणकारी आहेत. या अभियानाच्या माध्यमातून होत असलेली जनजागृती हा एक स्तुत्य उपक्रम आहे, अशा भावना अनेकांनी भेटी दरम्यान व्यक्त केल्या. अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती वाहतूक आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १० वर्षांतील प्रभावी कार्य, उत्तम संघटनात्मक बांधणी, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती ‘गाव चलो अभियान’मधून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.लाभार्थींची भेट घेत त्यांना मिळालेल्या योजनांची माहिती घेतली; तर केवायसी व इतर तांत्रिक कारणामुळे लाभ न घेऊ शकलेल्या नागरिकांनी त्याची पूर्तता करून योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी नवमतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजातील प्रतिभावंत व्यक्ती आदींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, अशीही माहिती दीपक मोढवे पाटील यांनी दिली.
” देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध विकास योजनांचा लाभ समाजातल्या अंत्योदय घटकापर्यंत पोहोचला. देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. विकसित राष्ट्र म्हणून भारताची जडणघडण होत असून जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान आहे.”
– मा. दीपक मोढवे पाटील – वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर…















