न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या चिंचवड शाखेने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्ण वर्षानिमित्त “ लोकमान्य सुवर्ण आरोग्य ” या योजनेच्या माध्यमातून संस्थेतर्फे जनसामान्यांसाठी अत्याधुनिक उपचारामध्ये विविध सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती लोकमान्य हॉस्पिटचे उपाध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी आज शनिवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सुनील काळे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. प्रीती रुपनार, डॉ. राम अग्रवाल व डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.
या योजनेमध्ये हृदयरोग तपासणी ही हृदयरोग तज्ज्ञ मार्फत होणार असून २ डी एको तपासणी ही केवळ ८०० रुपये, अँजीओग्राफी केवळ ५९९९ रुपये, मामोग्राफी तपासणी ७०० रुपये, एक्स रे, रक्त लघवी तपासणी वर ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे. लोकमान्य हॉस्पिटलमधे उपलब्ध तज्ज्ञद्वारे तपासणीसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. लोकमान्य हॉस्पिटलमधे होणाऱ्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया व तपासणीसाठी तसेच दुर्भिणीद्वारे होणाऱ्या हर्निया, एपेंडिक्स, पित्ताशयाचे खडे, लघवीच्या लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया , कॅन्सर तपासणी व कॅन्सर शस्त्रक्रियावरही २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया व खुब्याच्या शस्त्रक्रियावरही २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
या योजनेचा कालावधी २० फेब्रुवारी २०२४ ते २० मार्च २०२४ दरम्यान आहे. गरजू रुग्णांनी यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या चिंचवड शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य चिंचवडचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले आहे.














