- सर्वसामान्य रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार मिळेनासे झालेत.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- सारथी हेल्पलाइनवर आयसीयु (अतिदक्षता) विभागाविषयी तक्रार केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. गाडेकर हे आमच्याशी सूडबुद्धीने वागत आहेत. पेशंटला आयसीयू बेड उपलब्ध होत नाही. त्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होत नाहीत.
कर्मचाऱ्यामार्फत ते तक्रार स्वीकारत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार मिळेनासे झाले आहे. मनमर्जीप्रमाणे वागणारा डॉक्टर रुग्णांचे भलं करू शकत नाही.
आपण आयसीयु (अतिदक्षता) विभागाचे विभागप्रमुख डॉ. गाडेकर यांना जाब विचारावा. त्यांच्यावर कडक करवाई करून दुसऱ्या अधिकाऱ्याची या विभागात नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनधिकार संघटनेचे अध्यक्ष माजीद शेख यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे दिला आहे.














