- बिल्डरला हातपाय तोडण्याची दिली धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- फ्लॅटला लावलेले कुलुप तोडुन त्याचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला. आरोपींनी फिर्यादीला धमकी देवुन तिथे येण्यापासुन मज्जाव केला. फ्लॅटमध्ये त्यांनी भाडेकरूंना ठेवले. गैरहेतुने स्वतः फ्लॅटचे मालक असल्याचे आरोपींनी भासवले. भाडेकरुसोबत भाडेकरार करण्याचा अधिकार नसताना भाडेकरार केला. त्याआधारे एका फ्लॅटचे ४०,००० रुपये डिपॉझिट व दरमहा १६००० भाडे घेवुन स्वतःचा आर्थिक फायदा करून फिर्यादीचे नुकसान केले. फिर्यादीस तेथे आल्यास हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते आजपर्यंत अतुल्य रचना, थेरगांव येथे घडला. फिर्यादी दिपक जीवनदास पंजाबी (बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी १) शरद कुंडलिक बारणे व २) बाळासाहेब कुंडलिक बारणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी १७४/२०२४, भा.दं.वि कलम ३४१,४४८, ४२०,५०६, ३४ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे पुढील तपास करीत आहेत.














