न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- तिघांनी बनावट भारतीय चलनी नोटा स्वतःजवळ बाळगल्या. त्या बनावट आहेत हे माहिती असतानादेखील त्या चलनात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले.
ही घटना (दि. १६) रोजी बोडकेवाडी फाटा, माण, हिंजवडी रोड येथे उघडकीस आली. याप्रकरणी १) अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०, रा. श्रीनाथनगर, हिंजवडी), २) ओंकार रामकृष्ण टेकम (वय १८, रा. नारायणनगर, हिंजवडी), ३) विधीसंघर्षीत बालक यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी १७५/२०२४ भा.दं.वि कलम ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र १ व २ अटक आहेत. सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.














