न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२४) :- सीबीएसई मंडळाशी संलग्न करण्यासाठी उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीचे बनावट पत्र तयार केले. त्या पत्राच्या आधारे शाळेसाठी सी.बी.एस.सी मंडळाच्या मान्यतेसंदर्भात वापर केला आहे.
हा प्रकार (दि.०७/०६/२०२२ ते दि- १७/०२/२०२४) दरम्यान क्रिएटीव्ह एज्युकेशन सोसायटी संचलीत क्रिएटीव्ह पब्लिक स्कुल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येथे घडला.
महीला फिर्यादीने अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावेत पोलीस ठाण्यात ७०/२०२४ भा. द. वि. कलम ४६७,४६८, ४७१ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि चाटे पुढील तपास करीत आहेत.