- पोलिसांनी एकाच दिवशी केले दोघांना जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश आहे. तरीही या आदेशाचा भंग करुन दोघांनी स्वतःजवळ गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगले. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी भोसरी परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी पहिली कारवाई (दि. १८) रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास भोसरीतील रामनगर, बोपखेल नाल्याजवळ, रामनगर वस्तीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला केली. आरोपीने ५००० रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व २००० रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगले. आरोपीला पाहिजे आरोपीने गावठी कटटा दिल्याचे त्याने तपासात सांगितले. खंडेश्वर ऊर्फ सोन्या शिवाजी तांबे (वय २२ वर्षे, रा. गणेशनगर, बोपखेल) असे अटक आरोपीचे नाव आहे. पाहिजे आरोपी दिवाकर सुरेंद्र सिंग (रा. बोपखेल, पुणे) या दोघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात ९६/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनिरी जोनापल्ले पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या कारवाई पोलिसांनी (दि. १८) रोजी सायं ६.३० च्या सुमारास भोसरीतील खंडोबा माळ येथील मोकळया मैदानात केली. आरोपीने ४०,००० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व १५०० रु किं चे ०३ जिवंत काडतुसे जवळ बाळगले होते. लक्ष्मण सुरेश आखाडे (वय १९ वर्षे रा. दुर्गामाता कॉलनी, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात ९५/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चेकलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चेकलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि खाडे पुढील तपास करीत आहेत.















