- प्रवासादरम्यान कंपनं जाणवतात; अस्वच्छता आणि रंगकामाचीही गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- चिंचवडगाव चापेकर चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. चिंचवडकडून डांगे चौक, वाकड, हिंजवडीकडे जाणारी वाहतूक मोठ्या संख्येने याच पुलावरून जाते.
या पुलावरून जड-अवजड वाहने ये-जा करीत असताना मोठा कंपन जाणवतो. तसेच पुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. कचरा देखील आढळतो.
कठड्याला असलेला कलराचा पापुद्रा निघाल्याने पुलाला रंगकामाची गरज आहे. पालिकेने नियमितपणे या पुलाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. उणीवा भरून काढाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.














