न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- आप तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख शिवस्मारकाना भेटू देऊन अभिवादन करण्यात आले. प्रथम आकुर्डी येथील दत्तवाडी मधील शिवाजी महाराजांचा पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर भक्ती शक्ती निगडी, डांगे चौक, मोहन नगर व भोसरी पीएमटी चौक मधील शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी आपच्या शहराध्यक्षा सौ. मीनाताई जावळे ह्यांनी जयंतीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आमच्या पार्टीची विचारधारा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेवर आधारित आहे, सर्वांना मोफत शिक्षण, मोफत आरोग्य व स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार आहे व आमची पार्टी हे सर्व जनतेला देण्यासाठी कटीबद्ध आहे. आज महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याचा प्रकार सर्रासपणे चालू आहे, ह्यासाठी शिंदे सरकार दोषी आहे असे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. आज शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी या महाराष्ट्रद्रोही लोकांना दंड दिला असता.
ह्यावेळी सौ. मीनाताई जावळे (शहराध्यक्ष) श्री. चेतन बेंद्रे (अध्यक्ष पदवीधर आघाडी, महाराष्ट्र प्रदेश), अशोक लांडगे, शहर उपाध्यक्ष, सीमा बावनकर, सुंदराबाई ओव्हाळ, दमयंती नेरकर, राज चाकणे, प्रकाश हगवणे, स्वप्नील जवळे, सुरेश बावनकर, वैजनाथ शिरसाट, चंद्रमणी जावळे, प्रशांत कोळेकर, संजय मोरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)

