न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- शिवीगाळ केल्याच्या कारणावरून फिरस्ता इसम आरोपीने हातातील चाकु मयत इसम प्रकाश मारूती म्हत्रे (वय ४० वर्षे) याच्या डाव्या पायाच्या मांडीत जांगेत खुपसून वार केला. त्यांना गंभीर जखमी करीत जिवे ठार मारले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी सायं ५.०० च्या सुमारास बिजलीनगर चौकातुन हनुमान स्वीटमार्ट कडे जाणा-या रोडचे लेनचे कडेला सिमेन्ट ब्लॉकचे फुटपाथवर, नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी कमल किशोर भट (वय अंदाजे ४० वर्षे रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ५५/२०२४ भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले आहे. पोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.















