न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- दुय्यम निबंधक कार्यालयात डोणे गावातील जमिनीचे खोटे खरेदीखत बनवून फसवणूक केली. जमीनमालक माहित असताना देखील आरोपींनी ६,४०,००० रूपये घेत दस्त नोंद केली. हा प्रकार (दि.२६/०६/२०१५ ते ०२/०६/२०१६ पर्यंत) दुय्यम निबंधक श्रेणी १, मावळ-२ तळेगाव दाभाडे यांच्या कार्यालयात घडला.
फिर्यादी महेद्र राधू गंगावणे यांनी आरोपी १) भिमराव विष्णु वाघमारे, २) नामदेव विश्णू वाघमारे, ३) उमाजी उर्फ उमेश विश्णू वाघमारे, ४) बबाबाई नाना आगळे (सर्व रा.डोणे ता. मावळ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ८३/२०२४ भादवि कलम ४२०,१२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि इंगळे पुढील तपास करीत आहेत.













