न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा बुधवार (दि. २१) पासून सुरू होत आहे. सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे.
यंदा पिंपरी चिंचवड शहरातून २१ हजार ५०० परीक्षार्थी आहेत. यासाठी ३३ केंद्रांवर बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत आहे. परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे.
यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राजवळील १०० मीटरवर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रचालकांनी केले आहे.