न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ‘पीएमपीएमएल प्रशासनाने विशेष सुविधा जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीतच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
बारावीची परीक्षा आज २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे, तर दहावीची परीक्षा १ मार्च रोजी सुरू होणार आहे. परीक्षा कालावधीत बस पासधारक विद्यार्थ्यांचे पास त्यांच्या निवासस्थानापासून परीक्षा केंद्रापर्यंत वैध मानण्यात येतील.
त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावे लागणार नाही. तसेच परीक्षार्थी यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास काही मार्गावर अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.