न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- मंदिरातील दानपेटीचे कुलुप तोडुन शिव मंदिर, स्वामी समर्थ मुर्तीसमोर असलेल्या दानपेटीतील रोख रक्कम ७,४७८ रुपये चोरुन नेण्याचा तिघांनी प्रयत्न केला. तसेच डांबरी मुख्य रस्त्यालगत असलेल्या साई मंदिरातील दानपेटीतील अंदाजे रक्कम ४००० रुपये (निश्चित वर्णन सांगता येत नाही) लाकडी दानपेटीची कडी लोखंडी कटरने तोडुन असे एकुण ११,४७८ रुपये रोख नोटा व नाणी चोरी करुन नेली आहे.
ही घटना (दि. २२) रोजी रात्री ०१.०० ते ०१.१५ वा. च्या दरम्यान काळभोरनगर, चिंचवड येथे घडली. फिर्यादी प्रदिप गंगाराम शिंदे यांनी आरोपी १) रोहीत राहुल शिंदे २) लाला, ३) बाबु यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी १४८ /२०२४ भा..द.वि.कलम ३८०,४५७, ५११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्रं १ याला अटक केली आहे. पो हवालदार ६८४ हांडे पुढील तपास करीत आहेत.














