- सोन्याची चैन लांबवून ठोकली दुचाकीवरून ‘धूम’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- लहान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५ क्रॅकजॅक बिस्कीटचे पुडे आणि बाराशे रोख रक्क्म देत, बिस्कीट पुडे व पैसे फिर्यादीला देवाला वाहण्यासाठी दिले. त्या प्रसादामध्ये फिर्यादीच्या गळ्यातील ५०,००० रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन प्रसाद पावन होण्यासाठी आरोपींनी ठेवण्यास सांगितली.
फिर्यादी यांनी चैन प्रसादाच्या पिशवीत ठेवल्यावर आरोपी यांनी हातचालाखीने फिर्यादीच्या मालकीची सोन्याची चैन फिर्यादीजवळ दिलेल्या प्रसादाचा प्लास्टीकच्या पिशवीमधुन काढुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केली. त्यानंतर आरोपी त्यांच्या मोटार सायकलवरुन पळुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २२) रोजी सायंकाळी ५.०० वा.चे सुमारास ज्योतीबा मंदिराजवळ, इंदोरी, ता-मावळ जि-पुणे येथे घडला. फिर्यादी नारायण मारुती चव्हाण यांनी आरोपी दोन अनोळखी इसम (वय अंदाजे २५ ते ३० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ४०/२०२४ भा.दं.वि कलम ४२०,३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रेळेकर पुढील तपास करीत आहेत.















