न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- भारतीय मुल्याच्या चलनी नोटासदृश्य प्रिंटींग असलेल्या १४० बनावट भारतीय चलनी नोटा या बनावट आहेत, हे माहिती असतानासुद्धा चलनात आणण्याच्या उद्देशाने त्या तरुणाने स्वतः जवळ बाळगल्या.
(दि. २५) रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास मुकाई चौक, रत्ना चहासमोर, किवळे येथे पोलिसांनी कारवाई करीत तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सत्तर हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
ऋतिक चंद्रमणी खडसे (वय २२ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. देहुरोड पोलिसांनी ९३/२०२४ भादवि कलम ४८९ (क) नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.














