न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) बाळांच्या उपचाराची होणारी गैरसोय टळणार आहे. नवजात बालकांचा अतिदक्षता विभागात दहा बेड वाढविण्याच्या विचाराधीन रुग्णालय प्रशासन आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्यांना बेडअभावी परतावे लागणार नाही.
वायसीएम रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. वायसीएमच्या नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत फुल्ल होत आहे. परिणामी बाळांच्या उपचारासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक वेळेला पालक धोका नको म्हणून खासगी रुग्णालय गाठत आहेत. वायसीएम रुणालयात सध्या २५ बेडचे एनआयसीयू उपलब्ध आहे. मात्र, त्यातील पाच बेड बालरोग अतिदक्षता विभागासाठी (पीआयसीयू) वापरण्यात येत आहेत. म्हणजे एनआयसीयूसाठी केवळ २० बेड उपलब्ध आहेत. वाय
सीएममध्ये जन्म झालेल्या बाळांसाठी १५ बेड राखीव ठेवले आहेत. अन्य रुग्णालयांतून वायसीएममध्ये पाठविण्यात येणाऱ्या बालकांसाठी १० बेडचा वापर होत आहे. एनआयसीयूमध्ये यापूर्वी केवळ १५ बेडची सोय होती. या बेडची संख्या वाढविल्यानंतर देखील एनआयसीयू फुल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाळांवर योग्य उपचार होण्यासाठी आणखी दहा बेड वाढविण्याचा विचार रुग्णालय प्रशासनाचा आहे. मात्र त्यासाठी बराचसा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे अधिकारी सांगत आहेत.