न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- इलेक्ट्रीसिटी डिपार्टमेटमधुन बोलत असल्याचा बनाव रचला. फिर्यादी यांना बिल भरण्याचा बहाणा करुन आरोपीने “Anytime Desk ” नावाचे अॅप (स्क्रीन मिररिंग चे काम करणारे) डाऊन लोड करुन घ्यायला लावले.
त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलमधील माहिती चोरली. फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या एचडीएफसी अकाऊंट नंबरवरुन एकुण १,९२,३७० रुपये काढुन घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना ( दि.३०/०९/२०२३) ऑनलाईन पद्धतीने घडली.
फिर्यादी उज्ज्वल आनंद सन/ऑफ मिथीलेश कुमार यांनी आरोपी पंकज सिंगच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलिसांनी ८७ /२०२४ भा द वि कलम ४०६,४१९,४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६, ६६ सी, ६६ डी नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि ढमाळ पुढील तपास करीत आहेत.














