न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी क्र. १ याने फिर्यादीच्या बॉश लि. कंपनीचे एकुण ५,५२,००० रु. किं. चे वेगवेगळ्या मॉडेलचे ग्लो प्लग, एकुण १,८४० नग, जुवा कि.बं. हे त्याचे अली भाई अॅन्ड सन्स, पवार वस्ती, कुदळवाडी, चिखलीतील गोडाऊनमध्ये विक्रीसाठी ठेवले.
तसेच आरोपी क्र.२ याने बॉश लि. कंपनीचे एकुण ९,८६० रु.किं.चे वेगवेगळ्या मॉडेलचे व्हिल सिलेंडर किट, एकुण १७० नग, जु.वा. किं. अं.हे त्याचे बालाजी एन्टरप्रायझेस नावाचे दुकानामध्ये, टाटा कंपनीचे मटेरियलमेट समोरील चौकात, पुर्णानगर, चिंचवड या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवुन त्यांची विक्री केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी कमलेश विठठल पायगुडे यांनी आरोपी १) गणेश नागेश गोरतळे, २) बालाजी प्रेमनाथ उबाळे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी १२०/२०२४ कॉपी राईट अॅक्ट १९५७ चेकलम ५१, ६३ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मासाळ पुढील तपास करीत आहेत.














