न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी निवडणुक या भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २४ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
१) चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ७०६/२०२३ भादवि ३०२, ३०७, ३२६, ३२३, ३६४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४. (२५),५.२७.३५, महा.पो.का. कलम ३७ (१) (३) १३५ या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी नामे, (१) राहुल प्रल्हाद यादव, (टोळी प्रमुख) वय ३२ वर्षे, रा. गट नं. ८५०, विठ्ठल रुक्मीणी मंदीराचे शेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे २) नागेश गुलचंद सुर्यवंशी, वय २८ वर्ष, रा. सोळु प्राथमीक शाळेजवळ, ता. खेड, जि.पुणे ३) रोहन भानुदास यादव, वय २१ वर्ष, रा. चंद्रभागा गौशाळा जवळ, सोनवणे वस्तीजवळ, रामदास नगर, चिखली पुणे ४) आशिष भिमराव बजलव, वय २७ वर्ष, रा. रॉयल प्लाजा, तिसरा मजला, फ्लेट नं. ३०३, इंद्रायणी बजन काट्याचे शेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे ५) राजेश बहरीच निसाद, वय ३२ वर्ष, रा. प्रथमेश पार्क सोसायटी, फ्लेट न. १०९, पहिला मजला, बालघरे याचे एच.पी पेट्रोल पंपचे समोर, कुदळवाडी, चिखली, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
वरील टोळी प्रमुख याने त्याचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आधिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख महणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करून हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी चिखली, आळंदी, पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीर जिवघेणी हत्यारजवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे (गुन्हे), पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार (परि-३), सहा. पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर (गुन्हे -१), सहा पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर (भोसरी एमआयडीसी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, चिखली पोलीस ठाणे, सपोनि निता उबाळे, सपोनि वर्षा जगदाळे, पीसीबी गुन्हे शाखा, तसेच अंमलदार पो.हवा, सचिन चव्हाण, पो. हवा. व्यंकप्पा कारभारी, पी. सी.बी. गुन्हे शाखा, मपोहवा केदार (चिखली पो.स्टे), यांच्या पथकाने केली आहे.











