न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- रहाटणीतील जगताप डेअरी चौकातील साई चौकात रहाटणी येथे आरोपीने स नं १८/११/३ येथे १० गुंठे जागा आहे. ही जागा विक्रीस असल्याबाबत त्याने फिर्यादीस सांगितले होते. परंतु, या जागेवर लेटीकेशन आहे हे सांगितल नव्हते. जागेचा व्यवहार ठरवताना १ कोटी ८० लाख रुपयास ठरवला. त्या जागेच्या व्यवहारापोटी फिर्यादीकडुन आरोपीने अप्रामाणीकपणे व त्यांची फसवणुक करण्याच्या इरादयाने ९५ लाख रुपये घेतले. उर्वरित व्यवहार पुढे पूर्ण करुन न देता फिर्यादीने दिलेले ९५ लाख रुपये स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वापरुन फिर्यादीची एकुण ९५ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे.
तसेच फिर्यादीने त्यांचेकडे पैसे मागितले असता ”मी तुझे पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, तु जर परत इकडे दिसलास तर तुला मी काय आहे, ते दाखवतो”, अशी धमकी दिली. तसेच काही अनोळखी लोकांना फिर्यादीकडे पाठवुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार १४/०७/२०१८ पासुन ते आजपर्यंत घडला. फिर्यादी चैतन्य दिनेश शहा यांनी आरोपी सुरेश शंकरराव जुनवणे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी २३६/२०२४ भा.द.वि. कलम ४२०,४०६, ५०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.











