न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीकडुन एकुण ४४ किलो ७९० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. ज्याची ४४,७९,८०,००० एवढी किमत आहे. नमामी शंकर झा (वय ३२ वर्षे, रा. भेळ चौक, निगडी; मुळ गाव बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. ही कारवाई (दि. ०१) रोजी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्ती दरम्यान उघडकीस आली. या गुन्हयात पोलीस उप निरीक्षक विकास शेळके यांचाही सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
पिंपळे निलख भागात पेट्रोलिंग करीत असताना रक्षक चौकाचे पुढील बाजुस डी.पी. रोड पिंपळे निलख येथे पहाटे ०४/३० वा चे सुमारास हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला एक इसम सरकारी गाडी पाहुन घाईघाईने निघुन जावु लागला. सदर इसमाचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नमामी शंकर झा याला ताब्यात घेतले. त्याच्या हातातील पिशवीबाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला, त्यानंतर त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पिशवीमध्ये एम.डी. हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात २,०२,००,००० रु किंमतीचा ०२ किलो २० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच १०,००० रु किं.चा मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला. त्याबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ७५/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे. आरोपीतास आज न्यायालयात हजर केले असता त्याची ०७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे.
त्यानंतर दाखल गुन्हयाचा तपास हा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे वर्ग झाल्यानंतर आरोपी नमामी शंकर झा याच्याकडे तपास करुन तपासात त्याच्याकडुन निगडी येथुन ४२ किलो ७७० ग्रॅम एमडी असा एकुण ४४ किलो ७९० ग्रॅम एम डी ४४,७९,८०,००० किमतीचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयात पोलीस उप निरीक्षक विकास शेळके यांचा सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यास पोलीस रिमांड करीता न्यायालयात हजर करणार आहेत.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिं.चिं, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे पिं.चिं, स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त, चिंचवड विभाग, बाळासाहेब कोपनर सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव शिंगारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, स.पो.नि. प्रशांत महाले, स.पो.नि. सचिन कदम, व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या स्टाफने केली.













